Eknath Khadse is relieved by the Bombay Sessions Court एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. दरम्यान खडसेंना सशर्त हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्यावर PMLA अंतर्गत मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना नियमित जामीन मंजूर केला गेला आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला होता.
पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यावेळी एकनाथ खडसे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी सत्र न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा हा चुकीचा असल्याचं म्हटलं. तसंच, एकनाथ खडसे यांनी ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य केल्याचं देखील यावेळी खडसेंचे वकील मोहन टेकावडे यांनी म्हटलं.