Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Eknath Shinde: मराठा समाजासाठी लढणारा बुलंद नेता हरपला -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

eknath shinde
, रविवार, 14 ऑगस्ट 2022 (15:14 IST)
एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यन्त दुर्देवी आहे. या घटनेवर विश्वास ठेवणे अवघड आहे. मराठा समाजासाठी सातत्याने लढणारा नेता , सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व करणारा नेता आज आपल्यातून हरपला. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावण्या व्यक्त करत मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. त्यासाठीच ते निघाले असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि आपल्यातून हिरावून नेले. 
 
तर, उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी दुःख व्यक्त करताना म्हटले की, गरीबीतून दिवस काढत मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते. गेल्याच महिन्यात त्यांचा मी वाढदिवस साजरा केला होता. मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तीमत्व आज हरपले आहे. काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले आहे.
 
दुर्देवी म्हणजे की अपघात झाल्यावर देखील दोन तास रुग्णवाहिका आली नाही . हा घातपात होता की अपघात  या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आणि इतर कार्यकर्त्यांनी केली आहे. 
 
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या आजच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांची भावना होती, शासन त्यासोबत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PV Sindhu: दुखापतीमुळे पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणार नाही