Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाकडून टोल कर्मचार्‍याला बेदम मारहाण

एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाकडून टोल कर्मचार्‍याला बेदम मारहाण
नाशिकरोडवरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचार्‍याला बेदम मारहाण केली आहे. एकनाथ शिंदेंना व्हीआयपी एंट्री न दिल्याने मारहाण केल्याची माहिती आहे. मंगळवारी रात्री उशिरा शिंदे नाशिकहून ठाण्याकडे  जात असताना ही घटना घडली.

संदीप घोंगडे असे  टोल कर्मचार्‍याचे नाव असून  त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे नाशिकहून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या गाडीला व्हीआयपी लेनमधून सोडण्यास टोम कर्मचाऱ्यांनी नकार दिला. व्हीआयपी लेन बंद असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला आणि संदीप घोंगडे यांना बेदम मारहाण करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिपब्लिक डेच्या पथसंचलनात यूएईची आर्मी