केंद्र सरकार शेतकरी बांधव आणि घोर गरीबांसाठी अनेक योजना राबवत असते. देशात गरीब शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान किसान योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा केले जातात. याच पंतप्रधान किसान योजनेच्या धरतीवर लवकरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे गरीब शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात लवकरच शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरु केली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कृषी विभागाच्या बैठकीत घेण्यात आला असून या योजनेवर काम विभागाच्या पातळीवर सुरु करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी रुपये 6 हजार देण्यात येतील. या योजनेची तरतूद येत्या बजेटमध्ये करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतील ते पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल तसेच या योजनेच्या अॅप द्वारे तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे देखील जाणून घेऊ शकता.