महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री अचानक दिल्लीत दाखल झाले. या मुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये कुजबुज वाढली असून ठाण्यात निधी वाटपावरून शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींवर चर्चा वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ येत आहे. भाजपमध्ये इतर पक्षांची भरती सुरूच आहे. त्यात शिंदे शिवसेना आणि अजितदादांच्या जुन्या जाणत्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सध्या नाराजी आहे.
एकनाथ शिंदे हे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिंदे यांची उपस्थिती होती. या भेटीत राज्य सरकारमधील विविध विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.