Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकनाथ शिंदे हे भाजप आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री त्यामुळे केंद्रातून आलेला आदेश त्यांना पाळावा लागतो

sharad pawar
, बुधवार, 10 मे 2023 (07:43 IST)
रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय बैठकीसाठी शरद पवार हे सातारा दौऱ्यावर होते. बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रचारासाठी कर्नाटकात गेले होते, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. भाजपात आदेश देण्याची संस्कृती आहे. एकनाथ शिंदे हे भाजप आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे केंद्रातून आलेला आदेश त्यांना पाळावा लागतो. म्हणूनच तर ते भाजपच्या प्रचारासाठी कर्नाटका येथे गेले होते, अशी टीका शरद पवार यांनी केली.
 
यावेळी त्यांनी सामनातील अग्रलेखाचाही शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. 1999 साली राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आला. त्यावेळी मी ज्यांना क‌ॅबिनेट मंत्री पदावर संधी दिली त्या आमदारांना याआधी कधीच सत्तेत पद मिळाले नव्हते. मी स्वत: राज्यमंत्रीपदापासून राजकारणात सुरुवात केली आहे. पण मी अनेकांना डायरेक्ट कॅबिनेट मंत्री केले. तुम्ही लिहिले यांचे आमच्या मते काही महत्त्व नाही. राज्यात सत्तेत आलो, तेव्हा नव्या मंत्रिमंडळात सहभागी केले त्यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री केले होते. आम्ही तयार करतो की नाही ही कुणी लिहिले हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, त्यांचा लिहिण्याचा अधिकार आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो, असं म्हणत शरद पवरांनी सामना अग्रलेखाला प्रत्युत्तर दिलं.
 
शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असं काही बोलू नये. पवार साहेबांनी त्यांच्यावर बोलू नये असं मला वाटतं, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले होते. त्यावर आता शरद पवार म्हणाले की, जबाबदार पदांवरील व्यक्ती अशी वक्तव्य करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावं लागेल.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सिबिल स्कोअर’मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा