Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

निवडणूक संपली आता वसूली सुरु केली आहे : फडणवीस

Election
, बुधवार, 20 जानेवारी 2021 (15:58 IST)
निवडणूक संपली आता वसूली सुरु केली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. बिल्डर्सना हजारो कोटींची सूट या सरकारने दिली. मात्र, लॉकडाऊन काळात रोजगार गेलेल्या सामान्य माणसाकडून वीज बिल वसूल करण्याचा तुघलकी निर्णय घेणारं हे सरकार आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
 
“ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्याबरोबर आणि त्यामध्ये हार मिळाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली सुरु केली आहे आणि कनेक्शन कापण्याच्या गोष्टी सुरु आहेत. हजारो कोटींची सूट बिल्डर्सना दिली आहे. पण त्याचवेळी लॉकडाऊन काळात रोजगार नव्हता त्या सामान्य माणसाचे चारपट आलेली बिलं सुधरवण्याऐवजी ते बिल भरलं नाही म्हणुन कनेक्शन कापू अशा प्रकारे तुघलकी निर्णय घेणारं हे सरकार आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मसूद अझरवरवर सक्तीनंतर घाबरला दाऊद इब्राहिम, कुटुंबीयांना पाकिस्तानबाहेर पाठवले