Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विजेच्या शॉकने 19 जनावरांचा मृत्यू

विजेच्या शॉकने 19 जनावरांचा मृत्यू
, बुधवार, 30 जून 2021 (13:09 IST)
अमरावती जिल्हयात एक धक्कादायक घटना घडली. पारडी येथील वडाच्या झाडाची फांदी थेट विद्युत तारांवर कोसळली. यामुळे मोठ्या प्रमाणात स्पार्किंग होऊन विद्युत पुरवडा करणार्‍या तार तुटल्या आणि तारांच्या संपर्कात आलेली तब्बल 19 जनावरे दगावली आहेत.
 
19 जनावरे दगावल्याने पेरणीच्या हंगामात शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यात 9 गोवंश आणि 10 म्हशींचा समावेश होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
 
अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असली तर काही भागांमध्ये आज सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सध्या पेरणीचा हंगाम सुरु असून या भागात पेरणीसाठी पारंपारिक पद्धतीने गो वंशाचा उपयोग करण्यात येतो. दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी पेरणीचे काम सुरु असताना ढगाळ वातावरण होते तर काही भागांत जोरदार वारा व पाऊस सुरु झाला. अशात अनेक घरांचे छप्पर उडून गेले, झाडे उलमळून पडली तसंच पारडी येथील एका वडाच्या झाडाची फांदी विद्युत तारांवर कोसळली. या दुर्घटनेत तुटलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे तब्बल १९ जनावरांना आपला जीव गमावावा लागला. 
 
या घटनेनंतर आमदार रवी राणा यांनी यासंदर्भात पाठपुरावा करत नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

12 आंबे 1 लाख 20 हजारांना खरीदे केले, 11 वर्षांच्या मुलीच्या स्वप्नाला दिले पंख