Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुरुस्तीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचारी व अभियंत्याला धक्काबुक्की

दुरुस्तीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचारी व अभियंत्याला धक्काबुक्की
, शुक्रवार, 31 मार्च 2017 (22:35 IST)
खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचारी व अभियंत्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करण्याचा प्रकार बजरंगवाडीतील संताजीनगर भागात घडला. याप्रकरणी वायरमन राहुल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नका पोलीस ठाण्यात 20 ते 25 जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बजरंगवाडी येथील संताजीनगर परिसराचा वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीवरून वायरमन राहुल गायकवाड व त्यांचे सहकारी कमलेश पाटील तातडीने संबंधित ठिकाणी पोहचले. पाहणी केली असता जमिनीखालील केबल नादुरुस्त झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान एका व्यक्तीच्या चिथावणीवरून जमा झालेल्या लोकांनी त्यांना दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य घेऊन येण्यास मज्जाव करत अडवून ठेवले. माहिती मिळताच सहायक अभियंता विशाल निंबाळकर व तेजस सूर्यवंशी घटनास्थळी पोहचले. संबंधीत लोकांची समजूत काढून दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य घेऊन येण्यास निघालेल्या कर्मचारी व अभियंत्यांना मज्जाव करत जमावाने पुन्हा धक्काबुक्की व शिवीगाळ केली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतरच त्यांची सुटका होऊ शकली. बुधवारी (29 मार्च) पहाटे ही घटना घडली. वायरमन पवार यांच्या फिर्यादीवरून कृष्णा गोविंद गीते, इरफान पठाण, तारवेज शेख व त्याचा मामा, अन्वर दाढीवाला, रजत पगारे, चेतन, आतिक शेख, अल्ताफ, पप्पू वेल्डिंगवाला, गुड्डू, आकाश सोनवणे, अमोल जगताप, निलेश शिरसाठ, सैय्यद वगैरे 20 ते 25 (सर्व राहणार संताजीनगर, बजरंगवाडी, नाशिक) यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यातील काही आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुन्हा पत्रकारावर हल्ला