Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 19 February 2025
webdunia

35 आठवड्यांच्या गरोदर महिलेच्या पोटात मूल, त्या मुलाच्या पोटातही गर्भ आढळला , बुलढाणाचे प्रकरण

35 आठवड्यांच्या गरोदर महिलेच्या पोटात मूल, त्या मुलाच्या पोटातही गर्भ आढळला , बुलढाणाचे प्रकरण
, बुधवार, 29 जानेवारी 2025 (15:04 IST)
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 32 वर्षीय गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या गर्भात देखील गर्भ आढळले आहे. याला वैद्यकीय भाषेत ग़र्भाच्या आत गर्भ म्हणतात.ही अनोखी स्थिति आहे. या मध्ये विकृत गर्भ दुसऱ्या गर्भाच्या आत स्थित असतो. हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आहे. काही प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. 
35 आठवड्यांच्या या गर्भवती महिलेची बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालयात तिची नियमित तपासणीला गेली असता, अल्ट्रासाउंड केल्यावर ही असामान्य स्थिति डॉक्टरांच्या लक्षात आली. रुग्णालयाच्या प्रसूति तज्ञांनी सांगितले की, वैद्यकीय जगात गर्भातील भ्रूण म्हणून ओळखले जाणारे हे प्रकरण लांखातून एक किंवा पांच लांखातून आढळून येते.ही जगातील दुर्मिळ प्रकरणांपैकी एक आहे आणि आतापर्यंत जगभरात केवळ 200 प्रकरणे आढळून आली आहेत. यापैकी, काही प्रकरणे भारतात देखील ओळखली गेली आहेत, ज्यांची संख्या 10 ते 15 दरम्यान आहे.
डॉक्टरांना या प्रकरणात सामान्य गर्भाच्या पोटात आणखी एक भ्रूण सारखी रचना दिसली. हे पूर्णपणे असामान्य होते. या अवस्थेला 'गर्भातील गर्भ' असे म्हणतात आणि जेव्हा ही स्थिती उद्भवते तेव्हा प्रश्नातील गर्भ बहुधा अविकसित आणि विकृत असल्याचे आढळून येते. डॉक्टरांनी इतर तज्ज्ञांचाही सल्ला घेतला आणि या स्थितिला दुजोरा दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाकुंभमधील चेंगराचेंगरी वर फडणवीस आणि बावनकुळेंनी चिंता व्यक्त केली