Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लशीचे दोन डोस घेतल्याशिवाय 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार नाही लोकलचा पास

लशीचे दोन डोस घेतल्याशिवाय 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार नाही लोकलचा पास
, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (10:08 IST)
वैद्यकीय सेवा, दूरसंचार क्षेत्र, गॅस पुरवठा, पाणी पुरवठा आदी सेवेतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता लसीच्या दोन्ही मात्रा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
यापूर्वी अत्यावश्यक सेवेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून अशा कर्मचाऱ्यांना लसीकरणातून सूट दिली गेली होती. मात्र, आता लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या शिवाय या कर्मचाऱ्यांना लोकल वा रेल्वेचा पास मिळणार नाही.
राज्य शासनातर्फे यासंदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. आवश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आतापर्यंत त्यांनी लस घेतली आहे किंवा नाही हे न बघता रेल्वेचा पास देण्यात येत होता.

परंतु आता लसीकरणाला सुरुवात होऊन बराच काळ झालेला आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लसींचा साठाही मुबलक आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील संस्थांमार्फत लसींचा पुरवठाही सुरळीत होत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशी संबंधिताना लस अनिवार्य करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 
राज्य शासनाने याच महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी लसीकरण झालेल्या व्यक्तींची व्याख्या निश्चित केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आश्चर्यजनक ! म्यानमारमध्ये सापडला 100 दशलक्ष वर्ष जुना खेकडा, हा अमर खेकडा असल्याच्या शास्त्रज्ञांचा विश्वास