Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियाला बदली

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियाला बदली
, शुक्रवार, 7 मे 2021 (15:52 IST)
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली करण्यात आली आहे. दया नायक यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आले आहे. एटीएसमध्ये दया नायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर आता दया नायक यांची गोंदियाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे दया नायक यांना साईडलाईन केल्याचे पहायला मिळत आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
सप्टेंबर 2019 मध्ये दया नायक यांची मुंबई शहर येथील अंबोली पोलीस ठाण्यातून दहशवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली होती. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आली होती. नव्वदीच्या दशकातील 83 गुंडांचा एन्काऊंटर करुन गन्हेगारी जगताचे ते कर्दनकाळ बनले होते. त्यांनी गुन्हेगारी जगतावर दबदबा निर्माण केला होता. मात्र कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात ते अडकल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. 1995 च्या तुकडीतील डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या दया नायक यांनी अल्पावधीतच चकमक फेम अशी आपली ओळख निर्माण केली होती.
 
2006 मध्ये त्यांनी कर्नाटकात आपल्या आईच्या नावाने शाळा बांधली. या शाळेचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करणे त्यांच्या अंगलट आले. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्यासाठी एवढे पैसे आले कुठून ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यामागे एसीबीची चौकशी लागली. या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते. अलिकडेच काही वर्षापूर्वी ते पुन्हा पोलीस दलात रुजू झाले होते.
 
मागली वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याचा तपासाचं काम देखील दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते. या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं. या प्रकरणातील आरोपीला दया नायक यांनी कोलकाता येथे अटक केली होती. पलाश बोस असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदोरीकर महाराज यांच्या अडचणी वाढल्या; औरंगाबाद खंडपीठाची नोटीस