शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी (13 सप्टेंबर) महाराष्ट्र न्यायिक विधी सेना शाखेची स्थापना करण्यात आली.ही संघटना म्हणजे शिवसेनेची वकील संघटना असेल. या माध्यमातून पक्षाचं न्यायालयीन कामकाजही पाहिलं जाणार आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी राज्यातील 100 ते 150 वकिलांनी मुंबईतील शिवसेना भवन मध्यवर्ती कार्यालयात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
शिवसेना पक्षासोबत आम्हाला काम करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र न्यायिक विधी सेना' स्थापन करण्यात आली आहे. पक्षाच्या न्यायालयीन कामकाजासोबतच संघटनेमार्फत गरजू नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत दिली जाईल, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.