“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहणारे अनेक मुंगेरीलाल आहेत. स्वप्न पाहणं हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल,” असं भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
निंबाळकर म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मग मुख्यमंत्री काय आणि मंत्री काय. पक्ष शिल्लक ठेवणे ही त्यांची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये हुरूप राहावा म्हणून ते असे वक्तव्य करत आहेत आणि बॅनरबाजी करत आहेत.”
निंबाळकरांचं हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरील बॅनर्सच्या पार्श्वभूमीवर आलं. या कार्यालयाबाहेर गेल्या महिन्याभरात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले होते.
Published By- Priya Dixit