Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर संभाजी बिडीचे नाव बदलणार, लढ्याला मिळाले यश

अखेर संभाजी बिडीचे नाव बदलणार, लढ्याला मिळाले यश
, गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (15:50 IST)
संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. संभाजी बिडीचे नाव बदलावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आणि काही राजकीय संघटनांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला आंदोलन सुरु होत. याबाबत कंपनीने प्रसिद्धिपत्रक काढून माहिती दिली. 
 
संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन आणि इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही विडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.
 
मात्र नाव बदलण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. कंपनी आपल्या उत्पादनासाठी नवीन नाव कायदेशीर प्रक्रियेने नोंदवणार आहे.  जेणेकरुन हे नवीन नाव ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल, असं कंपनीचं म्हणणं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंगना वादात आता राज्यपालांची उडी, राज्य सरकारवर केली नाराजी व्यक्त