Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जावायचा जामीन होऊ देत नाहीत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र माझ्या जवायला का नाही?”

sharad pawar
, शनिवार, 22 एप्रिल 2023 (21:07 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात भाषण करताना आमदार एकनाथ खडसे  यांच्या जावायाचा उल्लेख केला. सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप करत शरद पवार यांनी खडसेंच्या जावायाला गेल्या सव्वा वर्षांपासून सरकारने जेलमध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप केला. त्यांना गेल्या सव्वा वर्षांपासून जेलमध्ये डांबून ठेवलं आहे. त्यांना लवकरच जामीन मिळाला नाही तर ते आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत, असा धक्कादायक शरद पवारांनी केला. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केले आहेत.
 
“मी भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भोसरी जमिनीचं प्रकरण माझ्यामागे लावण्यात आलं. वास्तविक या जमिनीच्या प्रकरणात कुठलंही तथ्य नाही. या प्रकरणाशी माझाही काहीही संबंध नाही, असा अहवाल एसीपीने कोर्टात सादर केला होता. मी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यामुळे जुना अहवाल बाहेर काढण्यात आला. त्या माध्यमातून माझ्यामागे ईडी लावण्यात आली”, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
 
‘राजकीय सुडापोटी माझ्यामागे ईडीची कारवाई’
“राजकीय सुडापोटी माझ्यामागे ईडीची कारवाई सुरू झाली. माझा जावई हा मुंबई आयआयटीचा एक स्टुडंट होता. त्यांनी कुठल्याही एजन्सीकडून पैसा काढलेला नाही. माझ्या जावायाला विनाकारण अटकवणं, त्याचा जामीन होऊ न देणं यासाठी परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या सर्वच एजन्सींकडून दबाव तंत्राचा वापर करून जावायचा जामीन होऊ देत नाहीत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र माझ्या जवायला का नाही?”, असा सवाल खडसेंनी केला.सरकारच्या सर्वच एजन्सींकडून दबाव तंत्राचा वापर करून जावायचा जामीन होऊ देत नाहीत. सर्वांनाच जामीन मिळू शकतो. मात्र माझ्या जवायला का नाही?”, असा सवाल खडसेंनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vasundhara Day 2023 ; हे आई वसुंधरे, सौंदर्य वर्णू तरी तुझं कित्ती!