Publish Date: Fri, 24 Mar 2017 (15:44 IST)
Updated Date: Fri, 24 Mar 2017 (15:45 IST)
देशभरात वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा अर्थात नीटसाठी 23 नवी केंद्र सुरु केली आहेत. यानुसार राज्यात चार नव्या केंद्रांची भर पडली आहे. अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्हांमध्ये अतिरिक्त केंद्र सुरु करण्यात आली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. नीटसाठी राज्यात आतापर्यंत नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी केवळ सहाच केंद्र होती. आता त्यात चार अतिरिक्त केंद्रांची भर पडल्याने ही संख्या 10 वर पोहोचली आहे. परंतु मराठवाड्यात एकही नवीन केंद्र मिळालेलं नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी औरंगाबाद हे एकमेव केंद्र आहे. यापूर्वी नीट परीक्षा 80 शहरांमध्ये घेतली जात असे. पण आता 23 नव्या केंद्रामुळे 2017 ची नीट परीक्षा 103 शहरांमध्ये होणार आहे.