बारावीच्या परीक्षेचा इंग्रजीचा पेपर हा फुटला नव्हता तर हा गैरप्रकार होता. त्यामुळे इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही असे राज्य माध्यमिक उच्च माध्यमक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. मंगळवारी सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर फुटल्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात असलेल्या तांबेवाडी आश्रमशाळेत घडला होता.
इंग्रजीचा पेपर सुरू झाल्यानंतर तास दीड तासातच प्रश्र्न पत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली होती. मात्र, पेपर सुरू झाल्यानंतर दीड तासाने प्रश्र्नपत्रिकेचे फोटो सोशल मीडियात आले होते. त्यामुळे याला पेपरफुटला असे म्हणता येणार नाही. तर हा गैरप्रकार असून त्याची गैरप्रकार म्हणून नोंद केली जाईल म्हणून इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.