suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक IT कंपनीत धक्कादायक प्रकार! धर्मांतर व शोषण प्रकरणात नवे पुरावे समोर

नाशिक IT कंपनीत धक्कादायक प्रकार! धर्मांतर व शोषण प्रकरणात नवे पुरावे समोर
नाशिकमधील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी (IT) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाचे अत्यंत संतापजनक प्रकरण उघडकीस आले आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ केल्याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तब्बल ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. संशयित आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून महिलांना जाळ्यात ओढले. पीडितेच्या तक्रारीनुसार तिला सुट्टीच्या दिवशी रिसॉर्टवर नेऊन मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 
पोलिसांची कारवाई
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारींनुसार, मुंबई नाका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये एकूण ९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणातील व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस अधिक पुरावे गोळा करत आहेत.
 
आयटी क्षेत्रात खळबळ
एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कंपनीत अशा प्रकारे महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नाशिकच्या आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या  प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
प्रशासनाने महिला कर्मचाऱ्यांना निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन केले असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: बनावट मांत्रिक अशोक खरात आज न्यायालयात हजर होईल