Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्री उदय सामंत, यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

shivsena
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (08:01 IST)
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकामागोमाग एक असे ४० आमदार शिंदेंबरोबर गेले. त्यामुळं ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. यांनतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरूवाल केली. आता सर्वात शेवटी शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
दरम्यान, शिवसेनेकडून सातत्याने बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यात आता शिंदे गटात सामील झालेले मंत्री उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. तसेच उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मलेशिया: क्वालालंपूरपासून 253 किमी अंतरावर 6.2 तीव्रतेचा भूकंप