Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महत्वाचे : दहावीच्या परीक्षा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

महत्वाचे : दहावीच्या परीक्षा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
, शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (10:31 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची मुदत सात दिवसांनी वाढविण्यात आली आहे. आता १४ नोव्हेंबरपर्यंत शाळांना नियमित शुल्कासह आॅनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
 
मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणा-या एसएससी बोर्ड परीक्षेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी ७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. परंतु, सर्व्हरचा व्यत्यय येत असल्याने शाळांनी मुदत वाढवण्याची मागणी बोर्डाकडे केली होती. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत १४ नोव्हेंबर, तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. 

आधार कार्ड सक्ती नाही
इयत्ता दहावीची आवेदनपत्रे भरताना आधार कार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केले असले तरी आधार कार्ड नोंदणी क्रमांकदेखील ग्राह्य धरला जाईल. नोंदणी केलेली नसेल तरी निकालापर्यंत आधार क्रमांक मिळण्याचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्याने प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांना देणे आवश्यक आहे. आधार कार्ड नाही म्हणून आवेदनपत्र नाकारता येणार नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डीएस कुलकर्णीं यांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात