Ladki Bahin Yojana News: महाराष्ट्र विधानसभेतील मोठ्या विजयानंतर, शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व भाजप नेते उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी 'लाडकी बहीण योजना' बंद करणार असल्याच्या अफवांना फेटाळून लावले आणि सांगितले की यासह प्रत्येक योजना महिला, दलित आणि उपेक्षितांच्या हितासाठी राबविण्यात आली आहे आणि ती पुढेही सुरू राहील असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत. महाराष्ट्रातील शिर्डी येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसांच्या राज्य परिषदेला फडणवीस संबोधित करत होते. फडणवीस म्हणाले, “अशा अफवा पसरत आहे की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजना बंद करू. मी हे स्पष्ट करू इच्छितो की महिला, दलित आणि उपेक्षित लोकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजना सुरूच राहतील. सध्याच्या योजनांव्यतिरिक्त, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने देखील पूर्ण करू.”