Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीस एक सर्वोत्तम विरोधी पक्षनेता : संजय राऊत

फडणवीस एक सर्वोत्तम विरोधी पक्षनेता : संजय राऊत
, गुरूवार, 27 ऑगस्ट 2020 (15:54 IST)
देवेंद्र फडणवीस एक सर्वोत्तम विरोधी पक्षनेता असून असून त्यांच्याइतका सक्षम नेता पाहिलेला नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी फडणवीस यांनी मत मांडलं असून राजकीय नेते असल्याने मतभिन्नता असू शकते असं म्हटलं आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “फडणवीस यांनी मत मांडलं आहे. मतभिन्नता असू शकते. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे जी लोकांपर्यंत पोहोचली आहे”. संजय राऊत यांनी फडणवीसांबद्दल मवाळ भूमिका घेण्यावरुन विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “या देशात त्यांच्याइतका सक्षम विरोधीपक्ष नेता पाहिलेला नाही. इतिहासात त्यांचं नाव उत्तम विरोधीपक्ष नेता म्हणून लिहिलं जाईल याची खात्री आहे”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्याज दरात आणखी कपात केली जाऊ शकते : दास