Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीस यांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध

फडणवीस यांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध
, शनिवार, 10 एप्रिल 2021 (22:42 IST)
राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध असून शनिवार आणि रविवारी म्हणजेच विकेंडला लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्ण लॉकडाऊनला पर्याय दिसत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटले. परंतु, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. व्यापाऱ्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घ्या आणि मगच योग्य तो निर्णय घ्या, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे.
 
कोरोनामुळे मागील वर्ष वाया गेले. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच जनतेला कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असे फडणवीस म्हणाले.
 
छोटे व्यापारी आता पूर्णपणे संपले, तर ते पुन्हा उभे राहणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था वाढवण्यावर भर दिला पाहिजे असेही त्यांना वाटते. तसेच RTPCR रिपोर्टही तात्काळ दिला पाहिजे. रेमडेसीवर कसे उपलब्ध होतील हे पाहिले पाहिजे. बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेही मत फडणवीस यांनी या बैठकीत व्यक्त केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपुरातील मिनी कोव्हिड हॉस्पिटलमध्ये आग, चौघांचा होरपळून मृत्यू