Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फडणवीसांचा मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटा

फडणवीसांचा मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटा
, गुरूवार, 28 जानेवारी 2021 (07:45 IST)
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यानचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कारशेडच्या वादामुळे रखडलेल्या मेट्रो-3 च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटाही काढला आहे. 
 
मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना कारशेडसाठी आरेतील झाडांची रातोरात कत्तल करण्यात आल्यानंतर एकच जनक्षोभ उसळला होता. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कांजूरमार्ग येथील जागा मिठागाराची असल्याचे सांगत केंद्र सरकारने त्यावर दावा केला होता. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या दोन तीन दिवसांत लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली होणार