Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्लॉटचा वेळेत ताबा न देण बिल्डरला पडले महागात, ग्राहकाचे 2.5 लाख रुपये परत करावे लागणार

प्लॉटचा वेळेत ताबा न देण बिल्डरला पडले महागात, ग्राहकाचे 2.5 लाख रुपये परत करावे लागणार
, शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (09:16 IST)
वेळेत प्लॉट ताबा न देणे शहरातील एका बिल्डरला चांगलेच भोवले आहे. बिल्डरला संबंधित ग्राहकास दोन लाख ५० हजार रुपये आठ टक्के व्याजाने परत द्यावे लागणार आहे. तर नुकसानभरपाईपोटी ३० हजार आणि तक्रार खर्च म्हणून पाच हजार रुपये देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
 
आयोगाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला. याबाबत हुजेफा सोडावाला यांनी वेरासिटी लँडमार्क प्रमोटर्स प्रा. लि. विरुद्ध आयोगात तक्रार दाखल केली होती. वेरासिटी लँडमार्कने मुळशी तालुक्यातील आंधळे येथे ‘लेक अव्हेन्यू फेज’ या नावाचा प्लॉटींग प्रकल्प सुरू केला होता. या प्रकल्पाची जाहिरात वृत्तपत्रांत देण्यात आली होती. ती जाहिरात पाहून तक्रारदारांनी त्या प्रकल्पात एका फ्लॉट विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सहा लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचा प्लॉट खरेदी केला. या व्यवहाराचा करार १२ जून २०१४ रोजी करण्यात आला. करारनाम्यानुसार १८ महिन्यांत त्या प्लॉटचा ताबा देण्यात येईल, असे कंपनीने सांगितले होते. त्यामुळे प्लॉटच्या किमतीपोटी तक्रारदारांनी दोन लाख ५० हजार रुपये बिल्डरला दिले. मात्र तक्रारदारांना वेळेत ताबा देण्यात आला नाही. 
 
तसेच २०१४ पासून भूखंडाबाबत नोंदणीकृत करारनामा देखील करून देण्यात आला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी ग्राहक आयोगात धाव घेत अ‍ॅड. लक्ष्मण जाधव यांच्यामार्फत तक्रार दाखल केली. प्लॉटसाठी भरलेले दोन लाख ५० हजार रुपये वार्षिक १० टक्के व्याजाने, नुकसानभरपाईपोटी एक लाख रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी २४ हजार रुपये देण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. या प्रकरणी नोटीस प्राप्त होऊन देखील कंपनीतर्फे आयोगात कोणी हजर राहिले नाही. त्यामुळे आयोगाने एकतर्फी निकाल दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलीस निरीक्षक तातडीने घटनास्थळी धाव घेत चिमुकल्या बाळाला जीवदान दिले