अहमदनगर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सामान्य नागरिकांची मी उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत त्यांना गंडा घालणारा तोतया सीआयडी अधिकाऱ्यास जेरबंद केले आहे. संदिप आत्माराम खैरनार (रा . वरनपाडा ता.मालेगाव जि .नाशिक) असे त्या भामट्याचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढल्या असुन त्याबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुपा पोलिसांना या तपासाबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार सुपा पोलिसांनी विविध घटनांचे विश्लेषन केले असता सर्व घटनांची पध्दत एकसारखी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.दरम्यान गोपनिय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू असताना जावळे येथील प्रल्हाद मोहन जावळे हे येवला येथुन पुणे येथे जात असताना सुपा गावातील सफलता हॉटेल जवळ एक दाढी वाढलेल्या अनोळखी इसमाने मोटारसायकलवर येत जावळे यांची गाडी थांबविली.
खाली उतरुन त्यांना दमदाटी व शिवीगाळ करून लागला याबाबत सुपा पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता त्या इसमाने मी सीआयडी डीपार्टमेंटचा अधिकारी असल्याचे पोलिसांना सांगितले.
परंतु त्याच्या हालचालींवरुन तो बनावट सीआयडी अधिकारी असल्याबाबत पोलिसांना संशय बळावल्याने त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संदिप आत्माराम खैरनार (रा.वरनपाडा ता.मालेगाव जि . नाशिक) असे सांगितले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सदर इसम हा तोतया सीआयडी अधिकारी असुन ,तो बनावट ओळखपत्राद्वारे लोकांची फसवणुक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या ताब्यातुन बनावट सीआयडी ओळखपत्र , आधारकार्ड , एक हिरो होंडा मोटारसायकल , काठी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .