सांगलीच्या मिरजे येथे बनावट नोटांचा कारखाना काढून चक्क 50 रुपयांच्या 1 लाख 90 हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सांगलीच्या मिरजमध्ये बनावट नोटांचा कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला. याठिकाणच्या एक लाख 90 हजारांच्या बनावट नोटा जप्त करत एकाला अटक करण्यात आली आहे.
अहद शेख,असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून मिरज शहरामध्ये राहत्या घरात तो बनावट नोटांची छपाई तो करत होता.सांगली पोलिसांनी गस्तीदरम्यान बनावट नोटा विक्री करताना अहद शेखला पकडलं.
अटकेनंतर त्याच्याकडून बनावट नोटांची छपाई करून विक्री करण्यात येत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शहर पोलिसांनी मिरज शहरातल्या शेख याच्या घरावर छापा टाकत बनावट नोटांची छपाई मशीनसह 50 रुपयांच्या एक लाख 90 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
शेख याच्याकडून 50 रुपयांच्या बनावट नोटा छापून विक्री करण्यात आल्या असून याची मोठी व्यप्ती असून या प्रकरणाचं आंतरराज्य कनेक्शन असल्याची शक्यता सांगली पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरणाचे पथक 7 जून रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना आकाशवाणी केंद्राजवळ एक जण बनावट नोटा विक्री करत असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी सापळा रचून कारवाई करण्याचा सूचना पोलीस निरीक्षकांनी दिल्या.
त्या साठी दोन पथके परिसरात पाहणी करण्यासाठी गेली. तर आकाशवाणी केंद्राजवळ संशयित आरोपी अहद शेखची झडती घेतल्यावर त्याच्या कडून 50 रुपये दराच्या भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या 75 नोटा जप्त केल्या. शेखची चौकशी केल्यावर त्याने मिरज घराजवळ एका खोलीत बनावट नोटांची छपाई करत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा छपाईचे मशीन, कागद, वेगवेगळ्या रंगाची शाई, लॅमिनेटर मशीन, रंगीत कागद असे साहित्य जप्त केले पोलिसांनी एकूण 3 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि शेखला अटक केली.