Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्जमाफीचा अध्यादेश जारी

कर्जमाफीचा अध्यादेश जारी
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून  या कर्जमाफीसंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी एकूण ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

तसेच कर्जमाफीसाठी शेतजमिनीच्या मर्यादेचा निकष लावला जाणार नाही, असेही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.  या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंतचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या एकूण कर्जमाफीचा आकडा हा ३४ हजार कोटी रुपये इतका असेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वाभिमानी सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार