Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ; राज्यात उद्यापासून पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज

शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ; राज्यात उद्यापासून पाऊस पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज
, गुरूवार, 17 ऑगस्ट 2023 (21:15 IST)
महाराष्ट्रासह देशात मान्सूनचे आगमन उशीराने झाल्याने शेतकरी चिंतेत होता. यानंतर जुलै महिन्यात धो-धो पडलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पाऊस उद्यापासून पुन्हा सक्रीय होणर असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
मागील काही दिवसांपासून ओढ दिलेला पाऊस उद्यापासून राज्यभरात पडण्याची शक्यता आहे. मुंबई या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकणात उद्यापासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
काही भागात येलो अलर्ट देखील असण्याची शक्यता आहे. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने काही काळ ओढ दिली होती. मात्र येत्या १८ आणि १९ ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल.
 
मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात ८५ टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या पावसात झालेली पिकांची लागवड धोक्यात आली आहे. आता पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पावसाने हजेरी लावल्यास तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
 
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल. तर, पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल. तर मराठवाड्यातही विविध भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम, मध्य आणि दक्षिम महाराष्ट्रात मात्र पावसाची ये-जा असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केबीसी घोटाळा:मुख्य सूत्रधार चव्हाणला 15 खटल्यांमध्ये जामीन मंजूर