Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलगी पळून गेल्यामुळे बापाची आत्महत्या

मुलगी पळून गेल्यामुळे बापाची आत्महत्या
औरंगाबाद , सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (19:09 IST)
एक घटना औरंगाबादमध्ये घरात आपल्या मुलीचे लग्न अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपले असल्याने बाप मुलीच्या लग्नाची सर्व तयारी करण्यात व्यस्त होता. मात्र, इकडे मुलीच्या मनात तर दुसराच विचार सुरु होता. अवघ्या ५ दिवसानंतर लग्न तोंडावर आले असताना मुलगी पळून गेली, आणि आता समाजात बदनामी होणार, लोकांना काय तोंड दाखवू या भीतीने मुलीच्या बापाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडलिया आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून, औरंगाबाद शहरातील संग्राम नगर उड्डाण पूलाजवळ घडलेल्या (Aurangabad suicide) या घटनेतील मृताची रविवारी सकाळी ओळख पटली. दरम्यान, बापाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत आपल्या मुलीला पुन्हा घरात घेऊ नका असं म्हटलं असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहरात (Aurangabad city) हळहळ व्यक्त होत आहे.
 
नेमकं चिठ्ठीत काय लिहिलं आहे?
आपली मुलगी पळून गेल्याचं प्रचंड दुख वडिलांना झाले होते. दरम्यान, त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या देखील केली. दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पँटच्या खिशात एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिले होते, ‘मी जग सोडून जात आहे. माझ्या मृत्यूनंतर मुलीला कधीही आपल्या घरात प्रवेश देऊ नको. माझ्या मुलाचे लग्न चांगले लाव. तू कायम आठवणीत राहशील,  मात्र त्या मुलीला आता माझ्या घरात स्थान नाही’. या मजकुराखाली सदर व्यक्तीने सही केली होती. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी उड्डाण पुलाजवळ धाव घेतली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिकी एकादशीला सजली पंढरी