rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खेळण्यासाठी मुलाला दिला मोबाईल, मुलाने शोधले बापाचे लफडे

Bangalore
बंगळुरुमध्ये राहणाऱ्या नागाराजूला (४३) ला आपल्या  मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे चांगलेच महागात पडले आहे. कारण मुलाने मोबाइलमधून वडिलांचेच विवाहबाह्य संबंध शोधून काढले. नागाराजूचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. मोबाइलमधले प्रेयसीसोबतचे ऑडिओ रेकॉर्डिंग मुलाच्या हाती लागले. ही गोष्ट त्याने आईच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे  १५ वर्षाचा संसार आता उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. नागाराजूलाच्या पत्नीने नवऱ्याविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसात धाव घेतली आहे. नवऱ्याने मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. पत्नी शाळेत शिक्षिका आहे.
 
या घटनेत ११ जुलैला नागाराजूने त्याचा मोबाइल फोन मुलाला खेळण्यासाठी दिला होता. खेळता खेळता मुलाने फोन रेकॉर्डर आणि व्हॉट्स अॅप चॅट ओपन केला. त्यावेळी त्याला वडिलांचे एका महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु असल्याचे कळले. वडील आणि संबंधित महिलेमध्ये झालेले अश्लील संवादाचे मेसेजेस त्याने पाहिले. त्याने लगेच आईला ते सर्व मेसेज दाखवले. जेव्हा पत्नीने नागाराजूला याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली. याबद्दल कुटुंबीयांकडे वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी नागाराजूने धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, मुकेश अंबानी यांना सलग ११ व्या वर्षी पगार वाढ नाही