rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

NEET मध्ये कमी गुण मिळाले म्हणून सांगलीत मुख्याध्यापक वडिलांनी घेतला मुलीचा जीव

death
, सोमवार, 23 जून 2025 (13:05 IST)
सांगली येथे एका वडिलांनी आपल्या मुलीला नीट सराव परीक्षेत कमी गुण मिळाले. वडिलांनी मुलीला जाब विचारला.मुलीने त्यांना प्रत्युत्तर दिल्याचा राग आला आणि त्यांनी मुलीला लाकडीच्या खुंट्याने बेदम मारहाण करायला सुरु केले. या मारहाणीत मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.साधना धोंडीराम भोसले असे या मुलीचे नाव आहे. तिचे वडील शाळेचे मुख्याध्यापक आहे. 
सदर घटना सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी तालुका आटपाडी गावातील आहे. साधना ही इयत्ता बारावीतील विद्यार्थी असून तिला डॉक्टर व्हायचं होत. या नाही ती नीटची तयारी करत होती. तिने नीट सराव परीक्षा दिली. काही दिवसांपूर्वी त्याचा निकाल आला आणि तिला त्यात कमी गुण मिळाले. तिच्या निकालावर वडील रागावले. या  वर बाबा तुम्ही कलेक्टर नाही झाला ना?  तुम्हाला देखील कमी गुण मिळाले असे प्रत्युत्तर दिले.
ALSO READ: मी रिकामा बसलेला नाहीये... एसआयटी चौकशीवर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया
याचा वडिलांना राग आला आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास वडिलांनी घरातील जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाणी केली .या मारहाणीत तिची प्रकृती गंभीर झाली.तिला तसेच सोडून दुसऱ्या दिवशी तिचे वडील योगादिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेत गेले. शाळेतून घरी आल्यावर ती बेशुद्ध असल्याचे आढळले. तिला रुग्णालयात नेण्यात आले असून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 
या अमानुष वर्तनाबद्दल गावात तीव्र संताप आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना-यूबीटी सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षातून राजीनामा दिला