सचखंड एक्सप्रेससमोर झोकून देत दोन चिमुकल्यांसह पित्याने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना नगरदेवळा ता. पाचोरा रेल्वेस्थानकाजवळ रविवारी सकाळी 11 वाजता घडली.
जितेंद्र दिलीप जाधव (31) असे पित्याचे नाव आहे. राज जितेंद्र जाधव (6) आणि खुशी जितेंद्र जाधव (4) अशी मुलांची नावे आहेत. सकाळी सचखंड एक्सप्रेस नगरदेवळा रेल्वे स्थानकातून जात असताना त्याने दोन मुलांसह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिले. कौटुंबिक वादातून त्याने हे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पूजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला असून जेसीबी चालक म्हणून काम करत होता. जितेंद्र आणि त्यांची पत्नी यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे पत्नी पूजाने आपल्या भाऊ, काका व काकु यांना चाळीसगाव येथे बोलावून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्रविरोधात विरुद्ध तक्रार दाखल केली होती. नंतर पूजा माहेरी निघून गेल्या आणि जितेंद्र मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता.
दरम्यान 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले व गावाबाहेर पडला. बोरखेडा येथील बसस्थानकावरील हॉटेलवर त्याने दोघ मुलांना वडापाव खाऊ घातले. नंतर सकाळी 11 वाजता सचखंड एक्स्प्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्याने घेतले आणि उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसात आत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.