विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी शिवसेनेचे राजापूरचे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर आता राष्ट्रवादीने दावा केला आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यांना 39 आमदरांनी समर्थन दिले. मात्र राजन साळवी हे शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेने त्यांना मोठी संधी देत विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी नाव पुढे केले. आता राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपकडून राहुल नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.