Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुग्णाच्या मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या ‘त्या’ डाॅक्टरवर गुन्हा दाखल

रुग्णाच्या मृत्युला कारणीभूत ठरणाऱ्या ‘त्या’ डाॅक्टरवर गुन्हा दाखल
, शनिवार, 5 जून 2021 (08:30 IST)
अहमदनगरमध्ये रुग्णाचा मृत्यूप्रकरणी नगर शहरातील एका डॉक्टरला जबाबदार धरण्यात येऊन त्या डाॅक्टरच्या विरोधात भिंगार कँप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ.रविंद्र भोसले असं गुन्हा दाखल झालेल्या डाॅक्टरचं नाव आहे. तर एका पोलिस कर्मचार्‍याच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, भोसले हॉस्पिटलमध्ये योगेश सुरेश भोसले (रा. वाकोडी ता. नगर) यांच्यावर 18 ते 20 डिसेंबर 2018 दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी मयत योगेश यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली होती.
 
यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. सायगावकर यांनी चौकशी करून योगेश यांचा मृत्यू उपचारात हलगर्जीपणा केल्याने झाल्याचा निष्कर्ष काढला. डॉ. सायगावकर यांनी तसा अहवाल भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 1 जून रोजी दिला. प्राप्त अहवालावरून डॉ. भोसले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेठ तालुक्यातील शिक्षकांनी दिली अद्यावत रुग्णवाहिका, १५ लाख किंमत