Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाकरे सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा- राज ठाकरेचा कार्यकर्त्यांना आदेश

webdunia
  • facebook
  • twitter
  • whatsapp
share
मंगळवार, 26 जानेवारी 2021 (11:06 IST)
'वीज बिलाबाबत घुमजाव करणाऱ्या राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हे दाखल करा' अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकऱ्यांना दिल्या आहेत.
 
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सरकार आणि ऊर्जामंत्र्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे.
 
राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने ग्राहकांनी वाढीव वीज बिल येत असल्याची तक्रार केली होती. मनसेने जास्तीचे बिल मागे घेण्यासाठी आंदोलन करत सरकारला निवेदनही दिले होते.
 
यासंदर्भात चौकशी होऊन अतिरिक्तचे बिल ग्राहकांना भरावे लागणार नाही असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. पण आता महावितरणने वीज बिलाची थकबाकी तात्काळ वसुल करण्याचे आदेश दिले आहेत.

Share this Story:
  • facebook
  • twitter
  • whatsapp

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

webdunia
शिवेंद्रराजेच नाही तर राष्ट्रवादी सोडलेले इतर नेतेही पक्षात परत येणार : नवाब मलिक