Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमदार नीलेश लंके यांच्या जीवनावर येणार चित्रपट !

आमदार नीलेश लंके यांच्या जीवनावर येणार चित्रपट !
, मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:29 IST)
लोक आग्रहास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांच्यावरच चित्रपट तयार करण्याचे ठरविले आहे. आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या जीवनावर येणाऱ्या चित्रपटाची घोषणा रविवारी ( ता. 24 ) दुपारी 2 वाजता पिंपळनेर येथे होणार आहे. कोरोना काळात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कोविड सेंटर सुरू करून चर्चेत आलेले आमदार लंके यांच्या जीवनावरील या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे होणार आहे.
 
पारनेर तालुक्यातील हंगा या छोट्याश्या गावात शिक्षकाच्या घरात जन्मलेले आमदार नीलेश लंके यांचा जन्म झाला. शिवसेनेत त्यांनी कार्यकर्ता ते तालुका प्रमुख असा राजकीय व सामाजिक प्रवास केला.लंके यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक हजार बेड्सचं कोव्हिड केअर सेंटर सुरू केलं होते, या ठिकाणी शंभर ऑक्सिजनच्या खाटा देखील होत्या. लंके हे स्वतः या कोव्हिड सेंटरमध्ये थांबून रुग्णांची काळजी घेत असल्याचे अनेक व्हीडिओ समोर आले होते.
 
कोरोना लॉकडाऊनमध्ये घरी निघालेल्या परप्रांतियांना नीलेश लंके यांनी माणुसकीच्या नात्याने मदतीचा हात दिला. कोरोना संकट काळात देशातील सर्वात मोठे कोविड सेंटर उभे करून 30 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनातून वाचविले. त्यामुळे त्यांचा सर्वदूर नावलौकिक झाला. आमदार नीलेश लंके यांच्या निकटवर्तीय असलेले लेखक, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे आमदार लंके यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचे काम हाती घेतले आहे. इरोळे यांनी नीलेश लंके यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर 2 वर्ष अभ्यास करून फिल्मसाठी स्टोरी पूर्ण केली आणि चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार भूमिका करणार असून चित्रपटाचे गाणे रेकॉर्डिंग जवळपास पूर्ण झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, 3 कोटी 25 लाख रुपये किंमतीचा गांजा पकडला