Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर ‘तो’ दिवस उद्या, दिवसभर ‘लोडशेडिंग’ !

अखेर ‘तो’ दिवस उद्या, दिवसभर ‘लोडशेडिंग’ !
, शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (15:51 IST)
अहमदनगर -वीज यंत्रणेतील दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी शनिवारी (२३ एप्रिल) अहमदनगर शहर व परिसरातील ग्रामीण भागात दिवसभर वीज बंद राहणार आहे.त्यामुळे आधीच घोषित आणि अघोषित भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखी आडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
 
पूर्वी ही कामे ९ एप्रिलला करण्यात येणार होती. मात्र, त्यावेळी अधिकृतपणे भारनियमन सुरू झालेले नसताना वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांचा मोठा विरोध सुरू झाला होता.
 
त्यामुळे महावितरण कंपनीने त्या दिवशीची कामे रद्द करून वीज पुरवठा सुरू ठेवला होता. आता ही कामे या शनिवारी म्हणजे उद्या करण्यात येणार आहेत.
 
त्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत नगर शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
 
वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
 
वीज बंद असणारा भाग पुढील प्रमाणे : नगर शहरातील सारसनगर, शांतीनगर, कोठी, बुरूडगाव रोड, विनायक नगर, महात्मा फुले चौक, साईनगर, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, गावडेमळा, चितळे रोड, कापड बाजार, सर्जेपुरा, लक्ष्मी कारंजा, नवी पेठ, शहाजी रोड, जुने मुकुंदनगर, दर्गा दर्या, सीआयव्ही सोसायटी, बोल्हेगाव, लालटाकी, अप्पू हत्ती चौक, रामवाडी, कोठला, कराचीवाला नगर या भागात वीज बंद राहील.
 
तर ग्रामीण भागात भाळवणी, ढवळपुरी, जामगाव, दैठणे गुंजाळ, काळकुप, माळकुप, गोरेगाव, भोयरे पठार, हिवरे बाजार, जेऊर, पांगरमल, उदरमल, धनगरवाडी, बहिरवाडी, इमामपूर, ससेवाडी, वाघवाडी, पांढरीपूल, खोसपुरी, पिंपळगाव माळवी, मांजरसुंबे, डोंगरगण, भोयरे पठार, हिवरे बाजार, अळकुटी, आणे, पळसपूर, भाळवणी, मिरी, गुंडेगाव उपकेंद्रातील सर्व वाहिन्या व त्यावरील परिसर येथील वीज शनिवारी दिवसभर बंद राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर…; पोलिसांनी दिल्या मनसेला सूचना