Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

अखेर ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित
, सोमवार, 8 मार्च 2021 (07:30 IST)
नाशिकमध्ये संपन्न होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे संमेलन  स्थगित करण्यात आले आहे. सदरचे साहित्य संमेलन 26, 27, 28 मार्च ला पार पडणार होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. महामंडळाने याबाबतची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे. पुढच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असंही कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
 
कोरोनामुळे यंदाचे साहित्य संमेलन यावर्षी घ्यायचेच नाही असं महामंडळाने ठरवलं होतं. पण नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोना प्रादुर्भाव कमी होत गेला. डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या टोक्यात आली होती. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा जाहीर केला होता. त्यानंतर संमेनलानाची तयारी जोरदार सुरु होती. तसेच निधी संकलन आणि इतर तयारीही जोमाने सुरु होती. मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. साहित्य महामंडळाने नाशिकमध्ये कोरोना कमी होण्याची पुरेशी वाट पाहिली, मात्र कोरोनाचा प्रसार कमी होण्याची चिन्ह दिसत नसल्याने नाशिकमधून येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. संमेलन अध्यक्ष, साहित्य संस्थाचे प्रमुख पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितल आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोबाईल हँग होण्यापासून कसे वाचवाल जाणून घ्या