Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उघड्यावर शौच करताना पकडले तर 500 रुपये दंड

उघड्यावर शौच करताना पकडले तर 500 रुपये दंड
राज्यात आता कोणत्याही व्यक्तीलाही उघड्यावर शौच करताना पकडलं, तर त्याला पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे. राज्य सरकारच्या शहर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, सरकारने कचरा व्यवस्थापन कायदा 2016 ची महापालिका आणि नगर परिषद परिक्षेत्रात तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्यातील अ, ब, क आणि ड श्रेणीतील महापालिकांसाठी दंडात्मक कारावाईची रक्कम एकच ठेवण्यात आली आहे.
 
नव्या निर्णयानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कचरा फेकून परिसर अस्वच्छ करत असेल, तर दोषी व्यक्तींकडून 150 ते 180 रुपये दंड वसूल केला जाईल. तर सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्या व्यक्तींकडूनही 100 ते 150 रुपये दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
 
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्याकडून 100 ते 200 रुपयापर्यंतचा दंड वसूल केला जाईल. विशेष म्हणजे, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून 500 दंड वसूल करण्याचे आदेशही यामार्फत देण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठवाडा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या