लातूर जिल्ह्यातील औसा मार्गावरील बुधोडाजवळील ओमेक्स फर्टीलायझर या कारकान्यात बॉयलरचा स्फोट झाल्यानं दोन कामगारांचा मृत्यू झाला. यातील एक कामगार लातुरच्या सेलुचा आहे तर दुसरा मध्यप्रदेशातील आहे.
या कारखान्यात टायर वितळवून तेल काढले जायचे, तेल उकळताना हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. मृतात बाबूमियॉ मुल्ला सेलू ता. ओसा आणि उदयचरण ललईराज कोल, बहरी, मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यासाठी लातूर आणि औसा येथील अग्निशामक दलाने प्रयत्न केले.
औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्फोट नेमका कशाने झाला याबद्दल वेगवेगळी माहिती मिळतेय. कारखान्याच्या प्रशासनाने याबाबत कसलीही माहिती दिली नाही.