Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिर्डीत साईंच्या पालखीमध्ये गोळीबार

crime
शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (18:43 IST)
शिर्डीत साईंच्या पालखीमध्ये गोळीबार ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर येथे घडली. गोळीबारात एक जण जखमी गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव विकी भांगे असे आहे. जुन्या वैमनस्यातून पवारांवर गोळीबार करण्यात आला असा कयास लावण्यात येत आहे. गोळीबार करणारा आरोपी हा निलेश पवार याचा मेहुणा असल्याचं समजत आहे. दोन वर्षांआधी निलेशने आरोपीच्या बहिणीसोबत पळून लग्न केलं होतं. याचाच राग मनात धरत आरोपीने निलेशवर गोळीबार केल्याचं बोललं जात आहे. 
  
गोळीबाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबारात निलेश जखमी झाल्याचे वृत्त आहे. खांद्याला गोळी लागल्याने त्याचा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
Edited by : Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rishabh Pant Accident:पीएम मोदींनी व्यक्त केले शोक, म्हणाले- पंतसोबत झालेल्या कार अपघातामुळे मन व्यथित झाले आहे