महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात भीषण अपघात झाला. लग्नाला वऱ्हाड घेऊन निघालेली खासगी बस पलटी होऊन अपघात झाला या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण गंभीर जखमी झाले. ही माहिती पोलिसांनी दिली.
सदर अपघात सकाळी 9:15 च्या सुमारास माणगाव जवळ ताम्हिणी घाटात झाला. बस पुण्यातील लोहेगावातून निघून महाडच्या बिरवाडीकडे जात असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटूनवाहन पलटी होऊन हा अपघात झाला.
या अपघातात दोन पुरुष आणि तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. 27 जखमींना माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.