Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बस आणि रिक्षा यांच्यात अपघात, २५ ठार

बस आणि रिक्षा यांच्यात अपघात, २५ ठार
नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. अपघातात ३४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण येथे चालली होती. बस आणि रिक्षाचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. 
 
जे प्रवासी या अपघातात मृत झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत केली जाणार आहे. तसंच जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांच्यावर होणाऱ्या उपचारांचा खर्च एस टी महामंडळातर्फे करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Adnan Sami : पाकिस्तानी वायुसेना अधिकाऱ्याचा मुलगा ते पद्मश्री पुरस्कार - अदनान सामीचा वादग्रस्त प्रवास