राज्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी भाजपने पाच नावे जाहीर केली असून त्यात पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. घोषित केलेल्या यादीत पंकजा मुंडे, डॉ. प्रणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिकेकर यांचा समावेश आहे. 12 जुलै रोजी विधानपरिषेदचे मतदान होणार आहे. निकाल त्याच दिवशी लागणार आहे असे समजले जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला. या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे मित्र पक्षांना संधी मिळावी म्हणूं रयत क्रांती मोर्चेचे सदाभाऊ खोत यांना भाजप कडून संधी देण्यात आली आहे.
तसेच बीड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार पंकजा ताई मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ओबीसी समाज दुखावला आहे. त्यामुळे यंदा पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेत संधी दिली आहे.पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे (एमएलसी) तिकीट देण्यात आले आहे. भाजपने 5 जणांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने या नावांद्वारे ओबीसी, आदिवासी, शेतकरी आणि बंजारा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच डॉ. प्रणय फुके, आणि योगेश टिकेकर यांना देखील भाजप कडून संधी देण्यात आली आहे.
आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदारकीचे तिकीट मिळाल्यावर सांगितले की, 'भाजपच्या नेत्यांनी माझ्यासारख्या मित्र पक्षाच्या छोट्या शेतकरी नेत्याला तिकीट दिले आहे. यासाठी त्यांनी पीएम मोदी आणि जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रात 12 जुलै रोजी MLC निवडणुका होणार आहेत. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात 11 जागा आहेत, ज्यावर विद्यमान MLC चा सहा वर्षांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या जागांवर फेरनिवडणूक होणार आहे. 12 जून रोजी सर्व 11 जागांवर मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी निकालही जाहीर होणार आहेत.