Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी राज्याच्या वाट्याला कमी डोस आले : टोपे

पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी राज्याच्या वाट्याला कमी डोस आले : टोपे
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (16:21 IST)
महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कोरोना लसीचे कमी डोस मिळाले असल्याचा मोठा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. “पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले आहेत,” असं राजेश टोपे यांनी  म्हटलं आहे. यासोबत केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 
“आपल्याला केंद्र सरकारने एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. बफर स्टॉकसहित बोलायचं गेल्यास आपल्याला १७ ते साडे सतरा डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकाराच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण डोस द्या. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेच ५५ टक्के डोस आलेल आहेत. त्यामुळे आठ लाख लोकांचं लसीकरण करायचं असतानाही आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण पाच लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
 
येत्या १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होत आहे. याबद्दल राजेश टोपेंनी बोलताना सांगितलं की, “मला समाधान आहे. आपण आठ लाख लोकांना अपलोड केलं आहे, त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्व बोर्डाच्या परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घ्या, मुंबई पालिका आयुक्तांनी दिली परवानगी