कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आ. रोहित पवार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दडपशाही करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी मौन धरणे आंदोलन केले.
जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहत असून नेतेमंडळींकडून निवडणुका जिंकण्यासाठी डावपेच रचले जात आहे. असेच काही राजकीय डावपेच कर्जत मध्ये होत असलेल्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येत आहे.(Ram Shinde)
कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आ. रोहित पवार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दडपशाही करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी मौन धरणे आंदोलन केले.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी भाजपच्या दोन नगरसेविकांनी उमेदवारी माघार घेतल्यानंतर राम शिंदे यांनी दडपशाहीचा आरोप करत मंदिरासमोर मौन बाळगून धरणे आंदोलन केले.
शिंदे हे कडाक्याच्या थंडीमध्ये भाजप कार्यकर्त्यांसह अक्काबाई मंदिराच्या बाहेर झोपून राहिले. मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता.
यामुळे आंदोलनाचे काय होणार याविषयी चर्चा सुरू असतानाच दुपारी एक वाजता पक्षाच्यावतीने शहरामधून काळया फिती लावून मूक मोर्चा काढून हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. अक्काबाई मंदिरासमोर जाहीर सभा घेण्यात आली.
यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीमध्ये रोहित पवार हे भाजपा उमेदवारांवर दडपशाही करून उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पडत आहेत. प्रभाग २ मधील भाजपा उमेदवारावर दडपशाही केली.त्यांना निवडणूक कार्यालयामध्ये आणून तेथील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना हाताशी धरून कायदा धाब्यावर बसवून उमेदवारी अर्ज काढून घेण्यात आला.
या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करून प्रभाग दोनमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी अशी मागणी आम्ही केली आहे.तसेच हिंमत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना उभा करून निवडणूक लढवा आणि जिंकून घेऊन नंतर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा असे राम शिंदे म्हणाले.