Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीरावआढळराव पाटील शिवसेनेतच! पक्षाने स्पष्ट केलं

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीरावआढळराव पाटील शिवसेनेतच! पक्षाने स्पष्ट केलं
, रविवार, 3 जुलै 2022 (12:25 IST)
काही तासांपूर्वी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले होते. ही कारवाई एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर गटात शामिल होण्याचा ठपका ठेवत असल्यामुळे करण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र शिवसेनेने हे वृत्त सामना वृत्तपत्रात अनावधानाने प्रसिद्ध करण्यात आले असून शिवाजीराव आढळराव पाटील हे अद्याप शिवसेनेतच आहे आणि उपनेतेपदावर कार्यरत असल्याचे स्पष्ट करत या बातमी साठी दिलगिरी व्यक्त केली आहे. या मुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.  
 
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. यानंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बंडखोरी करणाऱ्या अनेकांवर शिवसेनेनं कारवाईही केली. आणि यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असं वृत्त समोर आलं होतं.मात्र आता शिवसेनेनं शिवजीराव पाटील हे शिवसेनेतचं कार्यरत असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. 
 
कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील 
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे मोठे नेते मानले जातात. पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाचं पाटील यांनी 15 वर्ष प्रतिनिधीत्त्व केलं. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांच्या संसदेतील कामगिरीनिमित्त त्यांना संसदरत्न पुरस्कार देखील मिळाला आहे.मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला होता. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Maharashtra Assembly Session : शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड, बहुमताचा आकडा पार केला