Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिझ्ने + हॉट स्टारचे सबस्क्रिप्शन अपग्रेडच्या नावाखाली वृद्धेची साडेदहा लाखांची फसवणूक

fraud
, बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (09:21 IST)
नाशिक  :- एका ॲपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली एका अज्ञात सायबर भामट्याने एका वृद्धेची साडेदहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली नोंद अशी, की फिर्यादी महिला ऑनलाईन काही तरी ॲप सर्च करीत होती. त्यादरम्यान 7864049613 या क्रमांकावरून अज्ञात मोबाईलधारकाने या महिलेशी संपर्क साधला. त्यांना डिझ्ने + हॉट स्टार या ॲपचे सबस्क्रिप्शन अपग्रेड करण्याच्या नावाखाली संपर्क साधला. त्यादरम्यान गुगलद्वारे प्राप्त झालेल्या मोबाईलवर संपर्क करून अज्ञात इसमाने वृद्ध महिलेचा एनीडेस्क रिमोट ॲपद्वारे महिलेच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन त्यातून कस्टमर आयडीचा शोध लावला.
 
त्यानंतर या महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडून तिच्या बँक खात्यांविषयी माहिती मिळविली. त्यानंतर अज्ञात भामट्याने नेट बँकिंगद्वारे आयएमपीसी व एनईएफटीद्वारे दि. 4 ते 5 जानेवारीदरम्यान महिलेच्या बँक खात्यातून एकूण 10 लाख 50 हजार रुपये डेबिट करून घेऊन महिलेची आर्थिक फसवणूक केली.
 
या प्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे, शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार